वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

आदि मध्य प्रांत टाको

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074328 · अभंग क्र. ६०३

603.
आदि मध्य प्रांत टाकोनी वासना ।
करु हरिध्याना सोहंभावे ॥१॥
दिवसा कामा न रात्रीचा बडिवारु ।
हरि सहपरिवारु जाला आम्हा ॥२॥
जातीची विजाती नाही पै कुळधर्म ।
कुळीचा कुळकर्म हरि आम्हा ॥३॥
ज्ञानदेव सांगे वेदशास्त्र थोर ।
सांगतसे विचार आम्हा तुम्हा ॥४॥

अर्थ :
जगताची उत्पत्ति, स्थिती, अंत तसेच वासना या सर्वाचा विचार टाकून देऊन श्रीहरिचे सोहं रुपाने आपण ध्यान करु. आता या श्रीहरिच्या ध्यानाशिवाय दिवसा व रात्री काही एक काम उरलेले नाही. कारण आमच्या प्रपंचात सगळा परिवार हरिच झाला आहे. आम्हाला कुळधर्म, जातीचा आगर विजातीचा काही एक संबंध उरला नाही. अशी स्थिती झाल्यामुळे आमच्या कुळातला कुळधर्म एक हरिच बनला आहे. थोर अशा वेद शास्त्रांनी हाच विचार तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग