एकाची काजें फीटलें स
601.
एकाची काजें फीटलें सांकडें । उगाविलें कोंडे बहुतांची ॥१॥
तोचि हरी उभा चंद्रभागें तटी । कर ठेउनी कटी अवलोकित ॥२॥
पडता संकआट धांवतसे मागे । गोपाळांचिया संगें काला करी ॥३॥
चोरुनी शिदोरी खाय वनमाळी । प्रेमाचे कल्लोळीं आनंदाचे ॥४॥
यज्ञ अवदानीं करी वांकडें तोंड । लोणी चोरिता भांड गौळणी म्हणती ॥५॥
एका जनार्दनी ठेवणे संतांचे । उभे तेंसांचें विटेवरी ॥६॥
