ज्या नाव संन्यास षडु
613.
ज्या नाव संन्यास षडुर्मी जिंकी ।
स्वानुभवे सुखी निर्विकार ॥१॥
मानू आम्ही तया संन्यासी केवळ ।
येर ते खळ पोटासाठी ॥२॥
तिही आश्रमींची क्रिया ठसावेल ।
शांति ही लोळेल सर्वदेही ॥३॥
त्रिकाळाचे ज्ञान विधीचे पालन ।
ध्यास नारायण चित्तामाजी ॥४॥
निर्वैर अंतरी नुरे ज्या अहंता ।
संन्यासी तत्वता बहिणी म्हणे ॥५॥
