सत्य आणि मिथ्या जाणा
606.
सत्य आणि मिथ्या जाणा अंतरीचे ।
तुम्ही सकळाचे सर्वजाणा ॥१॥
म्हणऊनिया करा अनाथचा धावा ।
उठाउठी देवा पाचारिता ॥२॥
न चले झाकिले तुम्हापुढे काही ।
असा अंतर्बाही व्यापूनिया ॥३॥
जिवी एक दावी बोलोनि आणीक ।
तरि मज सकळिक दुषिति संत ॥४॥
निळा म्हणे माझे सबाह्य अंतर ।
तुम्ही निरंतर जाणतसा ॥५॥
