वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

मी माझे मोहित राहिले

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074331 · अभंग क्र. ६११

611.
मी माझे मोहित राहिले निवांत ।
एकरुप तत्त्व देखिले गे माय ॥१॥
द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटी ।
विश्वरूपे मिठी देतु हरि ॥२॥
छाया माया काया हरिरुपी ठाया ।
चिंतिता विलया एक तेजी ॥३॥
ज्ञानदेवा पाहा ओहं सोहं भावा ।
हरिरुपी दुहावा सर्वकाळ ॥४॥

अर्थ :
हे सखे, माझी स्थिती काय सांगू. एकरूप म्हणजे जीवब्रह्मैक्य तत्त्व पाहिल्यामुळे मी माझ्या स्वरूपाला म्हणजे परमात्मस्वरूपाला मोहित होऊन निवांत झाले. द्वैताच्या सर्व गोष्टी नाहीशा होऊन शेवटी विश्वरुपालाही मिठी देऊन म्हणजे विश्वरुप नाहीसे होऊन हरिरुपच शिल्लक राहिले. आभास, माया व शरीर यांचे स्वरुप पाहू गेले असता ती सर्व एकरूप श्रीहरिचे ठिकाणी लय पावली. अह सोहं भावरुपी जो श्रीहरि, त्याच्या ठिकाणी सर्व काळ आनंदानुभव आहे हे प्रत्यक्ष पाहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग