वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ३, श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६८ ते ६०१

सोंग संपादणी एका रूप

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074242 · अभंग क्र. ५९९

599.
सोंग संपादणी एका रूपे करी ।
आत्मा घरोघरी वर्ततुसे ॥१॥
माय सांग आम्हा कोण सुख ब्रह्मा ।
तुम्हा आम्हा समा कोण्या रूपे ॥२॥
चेतने चेतवी बुद्धीते पाचारी ।
कल्पना मापारी निवृत्ति ठायी ॥३॥
ज्ञानदेव दिवटा विठ्ठली रमला ।
संसार अबोला एकातत्त्वे ॥४॥

अर्थ :
एक परमात्मतत्त्व घरोघरी म्हणजे प्रत्येक जीवमात्राच्या जीवात्मरूपाने प्रवेश त्या त्या जीवांच्या कर्मानुसार सोंगसंपादणी करून राहात आहे. हे माऊली श्रीगुरूराया तुमच्या आमच्यामध्ये ते समानरूपाने कसे राहाते व त्या परब्रह्माचे आम्हाला कसे प्राप्त होईल ते सांगा. चिदाभासाला ज्ञान देणारा बुद्धिला चालना देऊन कल्पनेची भरोवरी करून त्याचा मापारी श्रीगुरू निवृत्तीरायच आहेत. जो श्रीगुरू निवृत्तिराय त्याच्या कृपेने परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहून संसारा विषयीचे मौन मी धारण केले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग