वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

नामाचा महिमा कोण जाण

🙏 4. संत नामदेव · ABH-083611 · अभंग क्र. ६०७

607.
नामाचा महिमा कोण जाणे सीमा| चतुर्मुख ब्रह्मा नेणे काही |॥१॥
संसारा आलिया हेचि आहे जोडी| अखंड घ्यावी गोडी हरिनामे ॥२॥
सहस्रमुखे शेष वाखाणिता कीर्ती | नाही तया तृप्ति आजवरी ॥३॥
पशु पक्षी तृण कीटक अपार | नामे गेले पार उतरोनि ॥४॥
कापुराचे राशी पडे अग्निकण | तैसे नाम जाण पातकासी ॥५॥
नामाग्नीने दोष जळती येकसरा | कैवल्य ये घरा बसले ठायी ॥६॥
नामा म्हणे धन्य नामाचा प्रताप | ध्याती एकरूप देवभक्त ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग