वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

अवघ्या बाही म्या व्य

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074352 · अभंग क्र. ६०४

604.
अवघ्या बाही म्या व्योम कवळिले ।
अवघ्या हृदयी अरुप धरिले ॥१॥
अवघेपणे मी त्याचीच जाले ।
तेचि पावले तदाकारे ॥२॥
कांही नसोनिया काही एक जाला ।
अवघाचि शोखिला ब्रह्मरसु ॥३॥
रखुमादेविवरु अवघाचि धरिला ।
अवघाचि गिळिला अवधेपणे ॥४॥

अर्थ :
माझ्या बाहुनी ते निराकार आकाशरुपी ब्रह्म मी कवळिले. आणि तेच रुप हृदयात धरुन ठेवले. सर्व प्रकाराने मी त्याचीच झाले. ब्रह्मरुप झाले. काही एक न होता मी तद्रूप होऊन ब्रह्मरस सेवन केला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, त्यांना मी पूर्ण स्वाधीन केल्यामुळे वेगळा ठेवला नाही. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग