वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कुडपियला देस आता नका

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076334 · अभंग क्र. ६०१

601.
कुडपियला देस आता नका करू बळ ।
झाले रामराज्य तुमचे वोसरले बोल॥धृ॥
धरा बाई लाज काही म्हणा रामराम ।
साहेबाचे देणे तेणे झाले पूर्णकाम ॥१॥
साहेबाचे देणे तेणे मोकळे केले आम्हा ।
गुरूकृपा जाणती संत काय कळे तुम्हा ॥२॥
रूक्यासाठी फोडू डोई हिजडी नाम आम्हा ।
निजभावाचा घेउनि डौर हिंडू चारीधामा ॥३॥
जाति कर्म कूळ नाही सौरियेच्या वेषा ।
बहिणी म्हणे निःशंकपणे हिंडो दाही दिशा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग