सकळ देवा शिरोमणी । स
605.
सकळ देवा शिरोमणी । सकळ तीर्थे वंदिती चरणी ।
सकळांसी मुगुटमणी । तो उभा पंढरीये ॥१॥
सकळ तेजाचा पुतळा । सकळ जयांच्या अंगी कळा ।
सकळ जीवांचा आकळा । तो उभा राहिल्या विटेवरी ॥२॥
सकळ मंत्रांचा मंत्र । सोपा सकळ पवित्र ।
सकळ पर्वकाळ परत्र । दर्शनेंचि घडति ॥३॥
सकळ अधिष्ठानाचें सार । सकळ गुह्मांचे माहेर ।
सकळ भक्तांचे जे घर । निजमंदिर पंढरी ॥४॥
सकळ वैराग्यांचा निधी । सकळा कृपेची तो मांदी ।
एका जनार्दनी निरुपाधी । आशापाश विरहित ॥५॥
