वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

वाचा नामसंकीर्तनी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088843 · अभंग क्र. ६००

600.
वाचा नामसंकीर्तनी ।
मानस तुमच्या निश्चये ध्यानी ।
नेत्र हे तुमच्या अवलोकनी ।
चालावे चरणी तीर्थयात्रे ॥१॥
करी करावे तुमचे पूजन ।
श्रवणी करावे गुणांचे श्रवण ।
चित्ते सदा तुमचे चिंतन ।
घ्राणी अवघ्राण निर्माल्य तुळसी ॥२॥
बुध्दीसी तुमची बोधकता ।
जीवी तुमची राहो आस्था ।
तुमचे चरणी निश्चळ माथा ।
अखंडता अखंड ॥३॥
सकळ इंद्रिया तुमची प्राप्ती ।
भगव्दावना राहो भूती ।
व्देषाव्देष तो नुमटो चित्ती ।
दयावे श्रीपती हे दान ॥४॥
कांमक्रोधाचे न व्हावे दर्शन ।
नका आशेतृष्णेचे बंधन ।
ठेवा आपुल्या पायी जीवन ।
दयावे समाधान सर्वदा मना ॥५॥
कीर्तन नित्यकाळ देवा तुझे ।
उतरी मी हे माझे ओझे ।
आपुल्या गुणी नाचवी भोजे ।
जिव्हा नामी रंगों दया ॥६॥
निळा म्हणे कृपानिधी ।
माझी मोडावी व्दैतबुध्दि ।
अवघी तोडुनिया उपाधी ।
स्थापा निजपदी शरणांगता ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग