तुळसीवृंदावन दर्शन ।
614.
तुळसीवृंदावन दर्शन । त्यासी वैकुंठी गमन । लटिके ह्मणे कोण । त्यासी आण केशवाची ॥१॥
तुळसीमाळा घाली गळा । त्या भेटे घनसांवळा । चतुर्भुज सहित कमळा । केशिराज प्रत्यक्ष ॥२॥
तुळसीरोपा घाली उदक । त्याचे हरती महादोष । ब्रह्मादिका न कळे नि:शेष । जन्ममरण त्या नाही ॥३॥
तुळसीची देवा बहु प्रीति । आणिक पुष्पे न लागती । नामा म्हणे जी श्रीपति । हेचि भक्ति द्यावी मज ॥४॥
