वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

देव आठवा संसार आटवा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076333 · अभंग क्र. ६०३

603.
देव आठवा संसार आटवा ।
पांग फिटवा तेव्हा सद्गुरूकृपा ॥१॥
ज्ञान करावे वैराग्य धरावे ।
स्वरूपा वरावे तेव्हा सद्गुरूकृपा ॥२॥
वृत्ती सोडावी निजवृत्ती जडावी ।
अखंडता घडावी तेव्हा सद्गुरूकृपा ॥३॥
मनासी दंडावे मायेसी भंडावे ।
द्वैतासी खंडावे तेव्हा सद्गुरूकृपा ॥४॥
भक्ति करावी समता धरावी ।
जाणीव सारावी तेव्हा सद्गुरूकृपा ॥५॥
असत्य त्यजावे सत्यासी भजावे ।
संतांसी पुजावे तेव्हा सद्गुरूकृपा ॥६॥
बहिणी म्हणे ऐशा निर्धारा करणे ।
तरीच वरणे सद्गुरूकृपा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग