वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

गोवळी होते राखणाईंत

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089824 · अभंग क्र. ७५

75.
गोवळी होते राखणाईंत ।
ते ते म्हणती झाला घात ।
गाई बुजल्या अकस्मात ।
पडणपात त्या झाला ॥१॥
मग ते आले पायवाटा ।
पाहाती गाई तव सुभटा ।
वत्से पान्हा घेती घटघटा ।
पूर लोटले क्षीराचिया ।
नेणो क्षीरसिंधु सोहळा ।
पाहो आपा कृष्ण लीला ।
तेणे क्षिराचीया सुकाळा ।
केले वत्सा आणि गौळीया ॥३॥
ऐसा झाला संध्याकाळ ।
तव पातले गौळणींचे मेळ ।
सांजवाणी दुडिया घेऊनी सकळ ।
करित गायने सुस्वरे ॥४॥
गौळी म्हणती पिंजल्या गाई ।
गोंविद म्हणे दोहा त्याही ।
आजि दुधाची उणेंचि नाही ।
न पुरती पात्रे तैसिचि क्षीरे ॥५॥
गोवळ आपुलालिये घरी ।
रात्री वसती सुखशेजारी ।
दिवसा जाती वनांतरी ।
वत्सापाठी हरिसंगे ॥६॥
निळा म्हणे चतुरानन ।
आला गोवत्से घेऊन ।
म्हणे नेण्ता महिमान ।
चुकी झाली क्षमा कीजे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग