कांही एक दिवस लोटलिय
75.
कांही एक दिवस लोटलियावरी । गोपी तिचे घरी प्रवेशली ॥१॥
म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीने सदन धुंडा-ळिले ॥२॥
म्हणे सये येथे नाही माझे घृत । ऐकोनिया मात क्रोधा-वली ॥३॥
चोरी नवनीत तुझे नाही गेले । माझे काय झाले पुसतसे ॥४॥
नष्टे अभिलाष केला सांग सत्य । बोलेनि निवांत राहिली ते ॥५॥
कलह करावा भ्रतारा कळेल । तो शिक्षा करील यथास्थित ॥६॥
न मिळे जाणोन म्हणे कृष्णार्पण । आलीसे बोलोन मंदिरासी ॥७॥
नामा म्हणे शूक सांगे परीक्षिती । ऐशा किती ख्याति तुज सांगो ॥८॥
