रिगुणे हे सर्व व्याप
75.
रिगुणे हे सर्व व्यापिलेसे जग ।
यामाजी श्रीरंग वेगळाची ॥१॥
विश्वाकार तोचि पहाता अनुभव ।
येथील गौरव सद्गुरु जाणे ॥२॥
उफराटी दृष्टी पाहिलियावरी ।
सौख्य हे अंतरी होय तेव्हा ॥३॥
बहेणि म्हणे गुण मायेचे अंकुर ।
ब्रह्म परात्पर अद्वयत्वे ॥४॥
