ऐसे विचारुनिया मनी ।
79.
ऐसे विचारुनिया मनी ।
म्हणे सौगडिया सारंगपाणी ।
बैल चांगला दिसतो नयनी ।
परी धारुं कैसा देईल ॥१॥
तुम्ही व्हारे पैलीकडे ।
दुरी परते वेघोनि हुडे ।
चौताळाता हा चहूकडे ।
करील रगडा सकळांचा ॥२॥
ते म्हणती बरे कृश्णा ।
परी तू सांभाळी हो आपणा ।
ऐसे म्हणोनिया पळती राणा ।
गिरींशिखरी बैसले ॥३॥
मग कास घालूनि गोपीनाथ ।
चालिला पुढे चुचकारित ।
तव तो म्हणे आजी कार्यार्थ ।
बरा साधला एकांती ॥४॥
जवळी यावयाची वाट पाहे ।
उगाचि स्तब्ध उभा राहे ।
हे जाणोनिया यादवराव ।
अंग राखोनि चमकतु ॥५॥
ऐसा आटोपिला हरी ।
तव ते मायावी आसुरी ।
धंविान्न्ला तयावरी ।
शिंगे पसरुनि विस्तीर्णे ॥६॥
निळा म्हणे फुंपात उठी ।
चौताळ लागे पाठी ।
तव हा परमात्मा जगजेठी ।
गाठी पडो नेदीचि ॥७॥
