आता उघडी डोळे । जरि
78.
आता उघडी डोळे । जरि अद्यापि न कळे ।
तरी मातेचिया खोळे । दगड आला पोटासी ॥१॥
मनुष्य देहा ऐसा निध । साधील ते साधा सिद्ध ।
करुनि प्रबोध । संत पार उतरले ॥२॥
नाव चंद्रभागेतीरी । उभी पुंडलीकाचे द्वारी ।
कट धरुनिया करी । उभाउभी पालवी ॥३॥
तुका म्हणे फुकासाठी । पायी घातलीया मिठी ।
होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥४॥
