सात पाच तीन दशकांचा
80.
सात पाच तीन दशकांचा मेळा ।
एक तत्त्वी कळा दावी हरि ॥१॥
तैसे नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ ।
तेथे काही कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणे उलट प्राणाचा ।
तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणे नामेंविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥४॥
अर्थ :
सात तत्व वैषाशिक गुण कर्म सामान्य विशेष समवाय व अभाव, त्रिगुण, पंचमहाभुते व इंद्रिय दशक म्हणजे शरिराचा मेळा बनतो पण चैतन्य स्वरुपात तो आपली कळा त्यात दाखवतो. हे सर्व तत्वार्थाने क्लिष्ट आहे त्या मानाने हरिनाम सहज सोपे आहे. आपले श्वासोश्वास प्रबंध बनवुन हरिनाम जपायला मनोनिग्रह लागतो. हरिनामाविण जगणे हे जगणे नाही म्हणुन रामकृष्णनामाचा पंथ स्विकारावा असे माऊली सांगतात.
