वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

पांगुळ जालो देवा नाह

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073102 · अभंग क्र. ७९

79.
पांगुळ जालो देवा नाही हात ना पाय । बैसलो जयावरी सैराट ते जाय ।
खेटिता कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । आधार नाही मज कोणी बाप ना माये ॥१॥
दाते हो दान करा जाते पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥धृ॥
हिंडता गव्हाने गा शिणलो दारोदारी । न मिळे चि दाता कोणी जन्म दुःखाते वारी ।
किर्ती हे संता मुखी तो चि दाखवा हरी । पांगळा पाय देतो नांदे पंढरपुरी ॥२॥
या पोटाकारणे गा जालो पांगीला जना । न सरे चि बाप माय भीक नाही खंडणा ।
पुढारा ह्मणती एक तया नाही करुणा । श्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा ॥३॥
काय मी चुकलो गा मागे नेणवे कांही । न कळे चि पाप पुण्य तेथे आठव नाही ।
मी माजी भुललो गा दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान संत महानुभाव कांही ॥४॥
दुरोनि आलो मी गा दुःख जाले दारुण । यावया येथवरी होते हे चि कारण ।
दुर्लभ भेटी तुह्मा पायी जाले दरुषन । विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून ॥५॥
मंगलाचरण पहिले दुसरे तिसरे काकडा भूपाळ्या वासुदेव

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग