संत नामदेवांचा वासुद
78.
संत नामदेवांचा वासुदेव
बाबा अहंकार निशी घनदाट । गुरुवचनी फुटली पहाट ।
माता भक्ति भेटली बरवंट ॥१॥
तिने मार्ग दाविला चोखट गा । नरहरी रामा गोविंदा वासुदेवा ॥२॥
एक बोल सुस्पष्ट बोलावा । वाचे हरि हरि म्हणावा ।
संत समागमु धरावा । तेणे ब्रम्हानंद होय आघवा गा ॥३॥
आला शीतळ शांतीचा वारा । तेणे सुख झाले या शरीरा ।
फिटला पातकांचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा ॥४॥
अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ ।
अनुभवे तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळु गा ॥५॥
वासुदेव समाप्त
जय जय वासुदेव हरि
भजन म्हणावे
