वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

तव ते आधिले मागिले ग

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089862 · अभंग क्र. ७६

76.
तव ते आधिले मागिले गोपाळ ।
सारिखेचि धैर्य वीर्य प्रताप बळ ।
हे देखोनिया विस्मित सकळ ।
म्हणती व्दिविध कैसेनि हे झाले ॥१॥
तैसेचि वत्से दोनी दोनी ।
एकएक गाईलागुनी ।
सुखे पिऊ देती स्तनी ।
आणि दुभती वोरसोनी यथेष्ट ॥२॥
तव ते असमाई गोठी ।
होती अघासुराचे पोटी ।
तेचि सांगती वडिला वोटी ।
म्हणती नवल वितले ॥३॥
आणि आम्हा अवघिया वनी ।
घातले होते सर्पे वदनी ।
मागे होता सारंगपाणी ।
तेणे तो चिरुनी टाकिला ॥४॥
मग वत्से आणि गोवळ ।
आम्ही बाहेरी पडिलो सकळ ।
त्याचे पहाहो करवाळ ।
रक्ते पूर वाहती ॥५॥
नवल ते ऐकोनि कानी ।
लोक चालिले पहावया नयनी ।
तव ते पडिले वाळोनी ।
गंगाओघा सारिखे ॥६॥
ये गोष्टीसी झाले वर्ष ।
गोवळांवाटे एकचि निमिष ।
निळा म्हणे सेविले शेष ।
तेणे सर्वदा समाधी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग