वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

माझा कृष्ण देखिला का

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090375 · अभंग क्र. ७५

75.
माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥धृ.॥ हाती घेऊनिया फूल । अंगणी रांगत आले मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥ माथा शोभे पिंपळपान । मेघवर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्रीभगवान । योगी ध्यान विश्रांती ॥२॥ संगे घेऊनि गोपाळ । बाळ खळॆ आळुमाळ । पायी पोल्हारे झळाळ । गळा माळ वैजंयती ॥३॥ एका जनार्दनी माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावें ते काय । कोणी सांगा गे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग