वत्से वत्सप वनांतरी
78.
वत्से वत्सप वनांतरी ।
माजी परमात्मा श्रीहरी ।
खेळता खेळ नानापरी ।
पुढे धेनुक देखिला ॥१॥
सांगता अंगीची बरव ।
मृणालिके ऐसी लव ।
शृंगे सुवर्णाची ठेव ।
रत्नापरी नयन दोन्ही ॥२॥
कर्णं जैसी केतकी दळे ।
अती राजस पादतळे ।
खुर शोभति रातोत्पळे ।
जेवी जडूनि ठेविली ॥३॥
चारी चरण कर्दळीस्ताभ ।
हदयावकाशी सूक्ष्म नभ ।
पाठीवरी त्रिवेणी भांव ।
पुच्छा स्वयंभ शेषफणी ॥४॥
कांबळी लोंबे कंठातळी ।
विधुत्प्राय टिळकू भाळी ।
वोसंड लवथवित् मांस मोळी ।
देखता नव्हाळी डोळिया ॥५॥
गोंवळ म्हणती कृष्णा पोहे ।
छ नवल वृष्थ आला आहे ।
चुकारिचाचि नवल नाहे ।
न्यावा धरुनि मंदिरा ॥६॥
निळा म्हणे ऐकोनि हरी ।
दृष्टी घालोनिया सामोरी ।
म्हणे धेनुक हा निर्धारी ।
आलासे मुक्ति मागावया ॥७॥
