कोणासी हे वर्म न कळे
75.
कोणासी हे वर्म न कळे तुमचे । ब्रम्हादिक पिसे वेडे झाले ॥१॥
तयांसी न कळे तुमचे लाघव । केली असे माव बाळपणी ॥२॥
वेडावोनी ब्रह्मा लागतसे चरणी । तुमची करणी न कळे कांही ॥३॥
चोखा म्हणे तुमचा ऐसा तो खेळ । असे तो आकळ वेदशास्त्रा ॥४॥
