वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ८, आंधळे अभंग

देश वेष नव्हे माझा स

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073090 · अभंग क्र. ८०

80.
देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलो । करू सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहीलो ।
पाय डोळे ह्मणता माझे तींही कैसा मोकलिलो । परदेशी नाही कोणी अंध पांगुळ जालो ॥१॥
आता माझी करी चिंता दान देई भगवंता । पाठी पोटी नाही कोणी निरवी सज्जन संता ॥धृ॥
चालता वाट पुढे भय वाटते चित्ती । बहुत जन गेली नाही आली मागुती ।
न देखे काय जाले कान तरी ऐकती । बैसलो संधिभागी तुज धरूनि चित्ती ॥२॥
भाकितो करुणा गा जैसा सांडिला ठाव । न भरे पोट कधी नाही निश्चळ पाव ।
हिंडता भागलो गा लक्ष चौऱ्यांसी गांव । धरूनि राहिलो गा हा चि वसता ठाव ॥३॥
भरवसा काय आता कोण आणि अवचिता । तैसीच जाली किर्ती तया मज बहुता ।
म्हणऊनि मारी हाका सोयी पावे पुण्यवंता । लागली भूक थोरी तूंचि कृपाळू दाता ॥४॥
संचित सांडवले कांही होते जवळी । वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी ।
निष्काम जालो देवा । होते माझे कपाळी । तुका म्हणे तू चि आता माझा सर्वस्वे बळी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग