मेरु तळवटी पाच पिंपळ
78.
मेरु तळवटी पाच पिंपळ । खाले वरोडा सेंडा वरी मूळ रे ॥
पाचहि पिंपळा एकचि फळ । त्याणे पक्षि गिळिला समुळ रे ॥
ऐक मी सांगेन पक्षियाची सोये । बाप नाही त्यासा भाये रे ॥
हात नाही त्यासी पाय रे । तो पक्षीविण उडोनिया ये रे ॥
त्याने त्रिभुवन गिळिले पाहे रे । तो विश्वची खेळत आहे रे ॥
बोधला धरी त्याचे पाय रे ॥
