राम माझा बाप । राम म
80.
राम माझा बाप । राम माझी माये । राम निजसोय दाखविली ॥१॥
राम माझ भाव । राम माझी बहिण । राम अंत:करणी । सदा वाये ॥२॥
माये आणी बाप । मावू या बहिणी । गोवियेले यांनी मायाजाळी ॥३॥
कोण्ही न विचारी । माझे काही हित । भुलविले चित्त नानापरी ॥४॥
बापे पांडुरंगे कैसी कृपा केली । त्याणे माझी केली काढाकाढी ॥५॥
बोधला म्हणे देवा । मी तुझे अनाथ । उध्दरी पतित पडिलो द्वारी ॥६॥
