वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 50. गोपी गर्व परिवार

निशी प्राप्त होता भ्

🙏 4. संत नामदेव · ABH-083266 · अभंग क्र. ७८

78.
निशी प्राप्त होता भ्रताराचे शेजे । गोपिका ती निजे आनंदाने ॥१॥
संधी पाहोनिया प्रवेशला देव । करीत लाघव काय तेव्हा ॥२॥
भ्रताराचे दाढी कांतेची ते वेणी । एकत्र करोनी ग्रंथी देत ॥३॥
करूनि कौतुक निघोनिया गेला । अरुणोदय झाला तये-वेळी ॥४॥
गोदोहनालागी गोपी ते उठत । वेणी आंसडीत दाढी-संगे ॥५॥
भ्रतारासी तेव्हा बोले ते कामिनी । न धाय अजूनि मन कैसे ॥६॥
भ्रताराची दाढी ओढितांचि जाण । सक्रोध होऊन बोल-तसे ॥७॥
मस्त होवोनिया माजली धांगडी । करिती ओढाओढी मजलागी ॥८॥
नामा ह्मणे तेव्हा उठोनी बैसती । आश्चर्य करिसी मनामाजी ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग