गोपीगोप तेथे पातली त
80.
गोपीगोप तेथे पातली त्वरित । हांसती समस्त देखो-निया ॥१॥
कृष्ण ह्मणे कैसी बांधिसी मजला । बांधिले तुजला भगवंते ॥२॥
पाया पडती रडोनी बोलती । सोडवा म्हणती आह्मां-लागी ॥३॥
पाहोनी किवे त्यांची दया आली चित्ता । कृपेने पाहाता मुक्त झाला ॥४॥
नामा म्हणे तेव्हा वंदोनी देवासी । गेली निज-धामासी आनंदाने ॥५॥
