वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 49. श्रीकृष्ण गोपी संवाद

श्रीकृष्ण गोपी संवाद

🙏 4. संत नामदेव · ABH-083791 · अभंग क्र. ७६

76.
श्रीकृष्ण गोपी संवाद.

एकदा श्रीकृष्ण खेळत असता । प्रवेशे अवचिता गोपीगृही ॥१॥
दोही करी तेव्हा नेत्र चोळीतसे । गोपी पुसते काय झाले ॥२॥
कृष्ण ह्मने माझे दुखताती डोळे । उपाय न कळे करू काय ॥३॥
पुत्रा़ची जननी तिचे दूध मिळे । घालितांची डोळे बरे होती ॥४॥
गोपी ह्मणे दूध देते मी काढून । ते नेमी घालून बरे करी ॥५॥
देव ह्मणे दूध तू काधून देसी । कैसा गुण त्यासी येईल सांग ॥६॥
माझिया कराने पिळून देसी स्तन । तरी येईल गुण लवकरी ॥७॥
ऐकतांचि गोपी धांवे मारावया । पळे उठो-निया नामा ह्मणे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग