सुखे सेऊ ब्रम्हानंद
75.
सुखे सेऊ ब्रम्हानंदा । गाऊ रामनाम सदा ।
नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥
करु वासुदेव स्मरण । तेणे तुटेरे बंधन ।
खंडेल कर्माचे विंदान । वासुदेव जपतांचि ॥२॥
तीर्थयात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठल नाम घेऊ ।
संतासंगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥३॥
लोभ ममता दवडू आशा । उदर व्यथेचा वोळसा ।
न करु आणिक सायासा । वासुदेवा वांचूनी ॥४॥
मुख्य वर्माचे हे वर्म । येणे साधे सकळ धर्म ।
एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ॥५॥
