पुंडलिके नवल केले ।
79.
पुंडलिके नवल केले । गोपिगोपाळ आणिले ॥1॥
हेचि देंई ह्रुषिकेशी । तुझे नाम अहर्निशी ॥2॥
नलगे आणिक प्रकार । मुखी हरि निरंतर ॥3॥
रुप न्याहाळिन डोळा । पुढे नाचेन वेळोवेळा ॥4॥
संर्वाठायी तुज पाहे । ऐसे देऊनि करी साह्य ॥5॥
धावा करिता रात्र झाली । दासी जनीसी भेट दिली ॥6॥.
