स्नान संध्या जप नित्
77.
स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान ।
करी सावधान आत्मनिष्ठे ॥१॥
फळाशा सांडोनी अहं कर्तव्यता ।
मोक्ष तो आइता तेथे असे ॥२॥
स्वधर्माचरण आपुलाले वर्ण ।
यज्ञ आणि दान करी सर्व ॥३॥
बहेणि म्हणे ऐसा साधील तो जरी ।
सत्त्व तो अंतरी प्रवेशला ॥४॥
