वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

करू देईना मज दुध तुप

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090365 · अभंग क्र. ७७

77.
करू देईना मज दुध तुप बाई । मथिता दधि तो धरी रवीं ठायी ठायी । हट्टे का कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजाउनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ॥१॥ राधे हा मुकुंद कडिये उचलोनि घेइ घेई । रडताना राहिना करु यांस गत काई काई ॥धृ.॥ हरिसी आनंदे राधा मृदु मृदु बोलवीते । पाळण्यांत तुला कृष्णा निजवोणी हालवितें । गुह्मा नेऊनियां दही भात कालवितें । यशोदेसी सोडी कान्हा माझ्याजवळी येई येई ॥२॥ हट्ट मोठा घेतो मला छळितो गे राधे पाहाणें । असाच हा नित्य राधे हरि घरा नेता जाणे । उगाचि हा निश्चळ कैसा राहे त्वा समजावल्यानें । तुझी धरिते हनुवटी यासी गुहां नेई नेई ॥३॥ गोविंदा गोपाळा कृष्ना मुकुंदा शेषशाई । जगज्जीवना गोकुळभुषणा गोपी भुलवणा बाई । उगा नको रडुं कृष्णा यशोदेसी सोडी तूंही । एका जनार्दनी शरण राधे । घेऊन यासी जाई जाई ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग