गोपी गर्व परिहार.
77.
गोपी गर्व परिहार.
यशोदे भोंवल्या मिळाल्या गौळणी । सांगती गार्हाणी नानापरी ॥१॥
गोरस भक्षोनि फोडितो भाजन । गोकुळा सोडोनि जाऊ सये ॥२॥
एक गोपी ह्मणे माझ्या घरा येसी । बांधीन खांबासी तुजलागी ॥३॥
यशोदेसी ऐसी सांगोनि गार्हाणी । चा-लिल्या कामिनी गृहाप्रती ॥४॥
नाना ह्मणे गोपी बोलिली बांधीन । तिजवरी विघ्न करी देव ॥५॥
