निरशून्य गगनी अंकुरल
76.
निरशून्य गगनी अंकुरले एक । ब्रम्हांड कवतुक लीळातनु ॥१॥
ते माये वो हरि गोपिका भोगिती । शुखचक्राकृती कृष्ण मूर्ती ॥२॥
निराभास आस निःसंदेह पाश । तोचि हृषिकेश नंदाघरी ॥३॥
निवृत्ति प्रकार ध्यानाचा विचार । सर्वत्र श्रीधर यशोदेचा ॥४॥
अर्थ:
त्या निराशुन्य आकाशातुन प्रगटलेल्या एका बीजाने आपल्या लिळेतुन हे जगत विस्तारले किंवा जन्माला घातले. तोच परमात्मा शंख चक्र घेऊन कृष्णरुपात गोकुळात अवतरला व त्याचे सुख तेथील गौवळणी नित्य भोगतात. निवृतिनाथ म्हणतात, मी सर्वत्र त्या यशोदेच्या श्रीघराला पाहतो व तोच माझा ध्यानाचा प्रकार बनला आहे. .
