आलिया संसारा उठा वेग
77.
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडूरंगा ॥१॥
देह हे काळाचे धन कुबेराचे । येथे मनुष्याचे काय आहे ॥२॥
देता देवविता नेता नेवविता । तेथे याची सत्ता काय आहे ॥३॥
निमित्ताचा धणी केला असे प्राणा । माझे माझे म्हणॊनि व्यर्थ गेला ॥४॥
तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी । देवासवे आटी पाडितोसी ॥५॥
