वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

तव कृष्णाभोवते गोवळ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089852 · अभंग क्र. ७४

74.
तव कृष्णाभोवते गोवळ ।
भासती चतुर्मुखचि सकळ ।
करीत वेदघोश कल्लोळ ।
पदे क्रमे निरुक्ते ॥१॥
ब्रम्हा म्हणे हे नवल झाले ।
ते तेथिल येथे हे कोठूनि आले ।
चतुर्मुखहि दिसती भले ।
न कळे महिमान श्रीहरिंचे ॥२॥
मग जोडूनिया पाणीतळ ॥३॥
चरणी ठेवू इच्छी निढळ ।
त्राहे त्राहे जी मी केवळ ।
दास डिंगर कृष्णा तुझा ॥३॥
ऐसा एक सुवत्सर ।
करीत होता नमस्कार ।
म्हणे वत्से आणि कुमर ।
आणवाल तरी आणितो ॥४॥
इकडे कृष्ण गोवळमेळी ।
आपणासवे आपण धुमाळी ।
खेळत आला पर्वतातळी ।
आणि वत्समुखे हुंबरला ॥५॥
चरता पर्वत मस्तकी गाई ।
ऐकोनी हुंकारिल्या ते ठायी ।
मग उडया घालुनिया पाही ।
पाजविती पान्हा वत्सांसी ॥६॥
निळा म्हणे जगत्रयजीवन ।
वत्से झाला असे आपण ।
यालागी स्नेहाचे महिमान ।
अधिकाधिक् गाईपोटी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग