कमति वाळिले धमति वाळ
79.
कमति वाळिले धमति वाळिले । सर्व हारपले जेथिचे तेथे ।।१।।
विधीते वाळिले निषेधा गिळिले । सर्व हारपले जेथिंचे तेथे ।।२।।
वेदाते वाळीले । शास्त्राते वाळीले । सर्व हारपले जेथिंचे तेथें॥ ।।३।।
चोखा म्हणजे माझा संदेह फिटला । देहीच भेटला देव आम्हा ।।४।।
