वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 12. राधाविलास - अभंग ७८ ते १०२

एके दिवशी शारंगपाणी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090347 · अभंग क्र. ७९

79.
एके दिवशी शारंगपाणी । खेळत असता राजभुवनी । तेव्हा देखिली नयनी । गौळणी ते राधिका ॥१॥ मीस करुनी पाणीयाचें । राधा आली तेथे साचे । मुख पहावया कृष्णाचे । आवड मोठी ॥२॥ देव उचलोनि घेतला । चुंबन देउनि आलंगिला । सुख संतोष जाहला । राधेलागीं ॥३॥ यशोदा म्हणे राधिकेसी । क्षणभरी नेई गे कृष्णासी । कडे घेउनी वेगेंशीं आणिला घरा ॥४॥ हृदयमंचकीं बैसविला । एकांत समय देखिला । हळूच म्हणे कृष्णाला । लहान असशी ॥५॥ कृष्णा म्हणे राधिकेसी । मंत्र आहे मजपाशी । थोर होतो निश्चयेंसी । पाहे पा आता ॥६॥ वैकुंठाचा मन मोहन । सर्व जगांचे जीवन । एका जनार्दनी विंदान । लाघव दावी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग