वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

गगनी वोळले येते ते द

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090088 · अभंग क्र. ७४

74.
गगनी वोळले येते ते देखिले । दर्पणी पाहिले बिंबलेपण ॥१॥
ते रूप सुरुप सुरूपाचा विलास । नामरूपी वेष कृष्ण ऐसे ॥२॥
सांडुनी धिंटिव जालासे राजीव । सर्वत्र अवेव ब्राह्मपणे ॥३॥
निवृत्ति घडुला सर्वत्र बिंबला । दर्पण वीराला आत्मबोधी ॥४॥

अर्थ:
जसे दर्पणात पाहिले तर स्वस्वरुप दिसते. तसे परमात्म्याचे विश्वात्मक स्वरुप गगनी प्रकाश रुपाने भासते. त्याच विश्वात्मक रुपाने कृष्णावतारात सुंदर देखणे असे सावळे रुप घेतले आहे. व ते रुप धारण करुन धिटाईने राज्यकारभार पाहिला तरी त्याचे सर्व अवयव ब्रह्म स्थितीच होते. निवृतिनाथ म्हणतात, त्या स्वरुपाचे सर्वात्मक घटांत प्रतिबिंब दिसते.त्याच परमात्म्याचे ज्ञान होते ह्या भावनेचा लय त्याच्या स्वरुपात होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग