का रे नाठविसी कृपाळु
79.
का रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥१॥
बाळा दुधा कोण करिते उप्तत्ति । वाढवी श्रीपति सवे दोन्ही ॥२॥
फुटती तरुवर उष्णकाळमासी । जीवन तयांसी कोण घाली ॥३॥
तेणे तुझी काय नाही केली चिंता । राहो त्या अनंता आठवूनि ॥४॥
तुका म्हणे ज्याचे नांव विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करी ॥५॥
