हरि हरि तुम्ही म्हणा
80.
हरि हरि तुम्ही म्हणा रे सकळ । तेणे मायाजाळ तुटतील ॥१॥
आणिक नका पडू गाबाळाचे भरी । आहे तिथे थोरी नागवण ॥२॥
भावे तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावे पतित वेळोवेळा ॥३॥
तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठी पार पाववील ॥४॥