नामाची लेखनी श्वानाच
1878.
नामाची लेखनी श्वानाचिये कानी | धांवतसे घाणी चर्माचिये ॥१॥
विंचू म्हणतसे उदार मी दाता | उचित है देता नलगे वेळ ॥२॥
सूकर म्हणे गृहस्थ मी भला | शेखी तयाचा डोळा विष्टेवरी ॥३॥
नापिक म्हणे माझी नांदणूक मोठी | धोकटी माझारी जन्म गेला ॥४॥
नामा म्हणे माझी वासना हे खोटी | विठ्ठलचरणी मिठी पडलिसे ॥५॥
