वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

आता तुझा भाव कळो आला

🙏 3. संत तुकाराम · ABH-080236 · अभंग क्र. १८७७

1877.
आता तुझा भाव कळो आला देवा । ठकूनिया सेवा घेसी माझी ॥१॥
टाकूनि साकडे आपुलिये माथा । घातला या संतावरी भार ॥धृपद॥
स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । ते कोण दातारा साच करी ॥२॥
जातीचे वाणी मी पोटींचे कुडे । नका मजपुढे ठकाठकी ॥३॥
तुका म्हणे नाही आले अनुभवा । आधीच मी देवा कैचा नाचूं ॥४॥

अर्थ :
देवा, आता मात्र तुझ्या मनातील अभिप्राय मला कळला आहे. तू मला काही न देता केवळ थापा मारून माझ्याकडून सेवा करून घेतोस आणि आपल्या डोक्यावर असलेली भक्तोध्दाराची जबाबदारी पार पाडणे कठीण आहे, असे पाहून ती टाकून देतोस, आणि संतावर सर्व भार घालतोस ; हे दातारा, भक्तांकडून आजवर तू पुष्कळच स्तुती करवून घेतली, आणि " पतितपावन, दीननाथ, भक्तवत्सल " इत्यादी ब्रीदांचा जगात डांगोरा पिटवून घेतला ; पण हे सर्व करवून घेताना गोड वाटले. आता ही ब्रीदवचने कोण सत्य करून दाखविणार आहे, ते सांग ना ? देवा, मी जातीचा व्यापारी असल्यामुळे कोणताही माल चांगला पारखून घ्यावा, हे माझ्या मनात माप असणारच ; त्यामुळे माझ्यापुढे अशी फसवाफसवी करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या ब्रीदवचनांचा अनुभव येणार नाही, तोपर्यंत अनुभव येण्याच्या आधीच " देव फार चांगला आहे. " अशी व्यर्थ कल्पना करून कशाकरता नाचत बसू.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग