कांडितांचि कोंडा न न
1880.
कांडितांचि कोंडा न निघे तांदूळ | शेरा कैसे फळ अमृताचे ॥१॥
कण्हेरीच्या मुळा सुगंध तो नाही | कसाबाची गाई जिणे कैचे ॥२॥
रुईदूध जरी येईल भोजना | लोभियाच्या धना बेंच नाही ॥३॥
निर्फळ हे जिणे भक्तिविण मन | नामा म्हणे जाण नये कामा ॥४॥
