वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 198. अन्य देवतांसंबंधी उपासकास उपदेश

आपुली करणी न विचारी

🙏 4. संत नामदेव · ABH-081952 · अभंग क्र. १८९७

1897.
आपुली करणी न विचारी मनी | वाया काय ठेवुनि बोल देवा ॥१॥
खाटकी जो चेपी पशुची नरडी | अवचिता करंगळी सांपडली ॥२॥
मेलो मेलो म्हणूनि गडबडा लोळे | परि कापी गळे आठवीना ॥३॥
आपुले म्हणवुनि विव्हळतसे | खदखदा हांसे दुसन्यासी ॥४॥
वाटपाडयाने घर खाणोनि घेतले | जितुके मेळविले तितुके नेले ॥५॥
आपुले नेले म्हणऊनि खळखळा रडे | परि घेता दरवडे आठवीना ॥६॥
सोनाराचे घरी पडिलेंसे खाण | चोरिले सुवर्ण तेंहि नेले ॥७॥
आपुले नेले म्हणवुनि मोकलितो धाया | ठकविल्या आयाबाया ते आठवीना ॥८॥
तराळाचे घरी असे आला जेवा | म्हणतसे देवा काय करू ॥९॥
दुसन्यासी मागता परम सुख वाटे | आपण देता फुटे काळीज ते ॥१०॥
जन्मवरी पोशिले लेंकुराचे परि | हाती घेऊनि सुरी उभा राहे ॥११॥
गर्दन सुळी देता म्हणे काय केले | पुढिल्यासि मारिले आठवीना ॥१२॥
नामा म्हणे विष्णुदास ऐसे जे निर्लज्ज | त्यासी पंढरिराज केंवि भेटे ॥१३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग