वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

देव मजुर देव मजुर ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080333 · अभंग क्र. १८८१

1881.
देव मजुर देव मजुर । नाही उजुर सेवेपुढे ॥१॥
देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनिया बळ लपतसे ॥२॥
देव वर काई देवतर काई । तुका म्हणे राई तरी मोठी ॥३॥

अर्थ :
देव भक्तांचा मजूर आहे. त्याने भक्तांकडून सेवारूपी वेतन घेतले असल्यामुळे त्याला भक्तांची सेवा करण्याविषयी ' हो, नाही ' अशी कोणतीच सबब सांगता येत नाही. देव, मोठा भित्रा व नामर्द आहे. कारण, भक्तांचे भावबळ पाहून तो लपून बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव केवढा आहे म्हणता ! एखादी मोहरी तरी मोठी असेल इतका तो सूक्ष्म आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग