परेंचे जे सुख पश्यंत
1896.
परेंचे जे सुख पश्यंती भोगी । तोचि राजयोगी मुकुटमणी ॥१॥
सिद्धाची ही खुन साधक सुख जाण । सदगुरुसी शरण रिघोनिया ॥२॥
वैखरी व्यापारी मध्यमेच्या घरी । ओंकाराच्या शिरी वृत्ति ठेवी ॥३॥
आदिनाथ ठेवणे सिद्ध परंपरा । जनार्दनी वेव्हारा एकनाथीं ॥४॥
